फ़ॉलोअर

मंगलवार, 14 जनवरी 2020

आदर्श नेता                                  आदर्श नेता
                "पंडित दिनद्याल उपाध्याय"
       भारतीय राजकारणात असंख्य आदर्श पुरुष होऊन गेले. याच असंख्य पुरुषांमध्ये एक असा पुरुष होता कि ज्यांच नाव आज देशातील सर्वात मोठा पक्ष अर्थात भारतीय जनता पार्टी क्षणो-क्षणी घेते. ज्यांच्या विचारांची शिकवण ह्या पक्षाला पुढे जाण्याची प्रेरणा देते व ज्यांच्या विचारांनी भारतीय जनता पार्टीने पुढे जाने अपेक्षीत आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे "पंडित दिनद्याल उपाध्याय".

पंडित दिनद्याल उपाध्याय कोन ? हा प्रश्न बहुतांश लोकाना पडला असावा. पंडित दिनद्याल उपाध्याय तेच ज्यांनी सर्वात आधी एकात्म मानववादाची संकल्पना मांडली खाय्रा अर्थाने त्यांनी हे कधी स्विकार केले नाही त्यांच्या मते एकात्म मानववाद ही भारतीय संस्कृतीचे दर्शन आहे व याची सुरुवात पुरातन भारतीय व्यवस्थेत आहे. जगात पुंजीवाद आणि साम्यवादामध्ये शितयुध्द चालु असताना या दोन्ही गोष्टींना समरस एकात्म मानववादाची संकल्पना पंडित दिनद्याल उपाध्याय यांनी मांडली.

पंडित दिनद्याल उपाध्याय यांचा पुर्ण जिवन परिचय जर सविस्तर रित्या बघीतला तर तो खुप खडतर होता हे स्पष्ट होत. पंडित दिनद्याल उपाध्याय यांचा जन्म २५ संप्टेबर १९१६ साली उत्तरप्रदेश मधील पवित्र भुमि मथुरामधील नगला चंद्रभान गावात झाला त्यांच्या वडीलांचे नाव भगवती प्रसाद उपाध्याय तर आईचे नाव रामप्यारी. पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्यावरुन वडीलांचे छ्त्र अडीच वर्षाचे असतानाच हरपले व नंतर १९२४ साली त्यांच्या आईचा ही स्वर्गवास झाला. पुढे त्यांच्या आजोबांकडे त्यांचे पालनपोषन झाले. पुढे आजोबांच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ मामाकडे होऊ लागला. पण इतक्या लहान वयातच पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्यावर खुप जबाबदाय्रा आलत्या. जबाबदाय्रा पार पाडत त्यांनी स्वताःचे शिक्षण हि पुर्ण केले त्यांचे हाईस्कुलचे शिक्षण वर्तमान राजस्थान मधील सीकर येथे झाले तर इंटरमिझीएट ची परिक्षा पिलनी येथुन पुर्ण केली पण याच काळात १९३४ साली आजारपणामुळे त्यांच्या लहान भावाचाही मुत्यू झाला पण ते डगमगले नाही १९३९ ला सनातन कॉलेज मधुन ग्रेजुएशनची डिग्री घेतली व नंतर इंग्रजी मध्ये एम.ऎ. करण्यासाठी आग्रामधील सेन्ट जॉन्स कॉलेज मध्ये प्रवेश घेतला परंतु त्यांच्या चुलत बहिनीची तब्यत अचानक बिघडल्या मुळे त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले.

ग्रेजुएशनची डिग्री पुर्ण करत असताना त्यांचे मित्र बलवंत महाशब्देंच्या प्रेरणेने १९३६ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आले. चालु आयुष्यात अडचणी खुप आल्या पण त्यांनी कधी माघार घेतली नाही. १९४२ मध्ये पंडित दिनद्याल उपाध्याय यांनी संघ शिक्षा वर्ग द्वितीय पुर्ण केला आणि पुढे प्रचारक बनुन १९४५ मध्ये उत्तरप्रदेश सहप्रांत प्रचारक म्हणुन जबाबदारी स्वीकारली.

पंडित दिनद्याल उपाध्याय एक बहुआयामी व्यक्तिमत्व होत. आणि तसाच त्यांचा सभ्य स्वभाव पंडित दिनद्याल उपाध्याय याना वेगवेगळ्या जबाबदाय्रा मिळत होत्या तसे ते पार हि पाडत होते. पंडित दिनद्याल उपाध्याय यांचे लेखन कौशल्य व त्यांच्या बुध्दीचा परिचय समस्त जनतेला १९४६ साली झाला त्यांनी एका रात्रीत सम्राट चंद्रगुप्त या पुस्तकाचे लिखान केले. तसेच ते खुप लोकप्रिय हि झाले व पुढे याच पुस्तकाचे अनुवाद अनेक भाषांमध्ये ही झाले. पुढे आद्य गुरु श्री शंकराचार्य यांची कथा ही त्यांनी रेल्वे प्रवासात खुप कमी वेळात पुर्ण केले.

१९४७ मध्ये लखनऊ येथे राष्ट्रधर्म या वृत्तपत्रानी त्यानी आपल्या पत्रकारतेची सुरुवात केली. पत्रकारतेला त्यांनी आपला व्यवसाय न मानता त्यांनी आपले ध्येय मानले. राष्ट्रधर्म या वृत्तपत्रावर पंडित दिनद्याल उपाध्याय यांचे नाव कधीही छापले गेले नाही परंतु त्यामधील प्रखर राष्ट्रवाद व धारदार लिखानातुन त्यांची ओळख पटायची. त्यांच्या प्रखर राष्ट्रवादी गोष्टींमध्ये ही त्यांचे लेखन कौशल्य इतके उत्कृष्ट होते की त्यांची भाषा सदा सयंमी आणि भाषेवर असलेल संतुलन कधी ही बिघडले नाही तसेच विरोधी पक्षकारांनाही त्यांचा कोणताही शब्द कधी खटकला नाही.

पंडित दिनद्याल उपाध्याय यांना पत्रकारतेमधला चांगला असा अनुभव नव्हता परंतु राष्ट्रधर्म पासुन झालेली सुरुवात त्यांना यश देत होती. पुढे साप्ताहिक पाञ्चजन्य मधुन त्यांनी स्तंभलेखनाची सुरुवात केली त्यांचे प्रयन्त हेच होते. की जनतेला नवीन गोष्टींची माहिती देण. पत्रकारिते मध्ये नवीन पत्रकरांना पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्यामुळे योग्य मार्गदर्शक मिळला व नविन पत्रकार पत्रकारतेला ध्येय या दृष्टिकोनातुन पाहु लागले. पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्या लेखनात सत्ताधारी लोकांनवर कधी ही नरम दृष्टिकोन ठेवत नसत पण त्यांची भाषा सौम्य होती. पंडित दिनद्याल उपाध्याय यांचे विचार होते की पत्रकाराला कधीही सत्त्यच मांडायला हवे. पण त्यांचे मत हे ही होते की कटु सत्य हे सौम्य भाषेतच लिहायला हवे पत्रकारतेमध्ये दैनिक स्वदेश ही त्यांच्या लेखन कौशल्याने उज्यागर झाले. त्याची संपादन म्हणून जबाबदारी पुर्व पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींना देण्यात आली.

पंडित दिनद्याल उपाध्याय यांनी राजकारण, साहित्य, अर्थव्यवस्था व मानवता या प्रत्येक विषयावर आपले विचार मांडले आणि भारताच्या भविष्याची जी कल्पना त्यांनी मांडली ती आज ही खुप महत्वाची आहे. अर्थव्यवस्थे मध्ये "द टु प्लांटस" या पुस्तकामधुन त्यांनी विदेशी अर्थव्यवस्थेचे स्वरुप तयार करुन मांडले त्यांच्या आर्थिक नितीच्या विचारांची ऒळख खालील ऒळींवरुन होते.

   "आर्थिक योजनाऒं तथा आर्थिक प्रगती का 
 माप समाज के उपर की सीढ़ी पर 
 पहुँचे हुए व्यक्ति नहीं, बल्की सबसे 
        नीचे के स्तर पर विद्यमान व्यक्ति से होगा"
                                                                               -पंडित दिनद्याल उपाध्याय
याच विचारांवर ध्यान केंन्द्रीत करुन श्रीमंत, सामान्य आणि गरीब या वर्गांना एकत्रीत करुन भाजपाने २०१४ मध्ये  "सबका साथ, सबका विकास" हा नारा देत सत्ता प्राप्त केली.

पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्या वैचारिक दृष्टी ही नाही तर त्यांच्या आचार आणि व्यवहारामधुन ही कार्यकर्त्ये खुप काही शिकत होते, कठिण प्रश्न ही ते आपल्या दैनिक कामातुन सविस्तर रित्या सोडवत होते आणि याच त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना राजन्यतिक जबाबदारी देण्यात आली. २१ सप्टेंबर १९५१ रोजी पंडित दिनद्याल उपाध्याय यांनी उत्तरप्रदेश मध्ये एक राजन्यतिक संमेलनाचे सफलता पुर्वक आयोजन केले आणि याच संमेलनात देशात नविन पक्षाची स्थापना झाली अर्थात भारतीय जन संघ पुढे एका महिन्यात २१ ऑक्टोबर १९५१ रोजी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जीनी भारतीय जन संघाच्या प्रथम अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष पद स्वीकारले.

पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्यात संघटन करण्याची अध्दभुत शक्ती आणि अव्दितीय क्षमता होती जसा जसा वेळ जात होता तसा जन संघाचा विस्तार होत होता. तसा भारतीय जन संघासाठी असाही दिवस आला की १९६७ मध्ये नम्रत्येचे प्रतिक अशा महान नेत्याला जन संघाचा अध्यक्ष म्हणुन प्रतिष्ठीत केले गेले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जीनी पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्या वर प्रभावित होऊन असे उद्दगार काडले होते की
"भारत को दो दिनद्याल मिल जाते तो भारत का 
राजनितीक प्ररि-दर्शक ही अलग होता"

भारतीय जन संघ राजकारणात उभारी घेतच होता की डॉ श्यामा प्रसाद मुखर्जींची रहस्यमय परिस्थितीत हत्या झाली. नवजात पार्टीला सांभाळण्याची जबाबदारी पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्यावर आली. राजन्यतिक कार्य करतानाहि संघटनात्मक कार्य त्यांच्यासाठी सर्वच्य होते. त्यानी १९६७ मध्ये भारतीय जन संघाच्या कालीकट अधीवेशनामध्ये  पार्टीचा अखिल भारतीय अध्यक्ष पद तेव्हा स्वीकार केल जेव्हा पार्टीचा संघटनात्मक काम पुर्ण झालत.

११ फेब्रुवारी १९६८ भारताचा व प्रामुख्याने जन संघाचा काळा दिवस या दिवसी लखनऊ वरुन पटनाला जाते वेळी मुघलसराई रेल्वे स्टेशनच्या समोर रेल्वे रुळांच्या शेजारी एक संशयास्पद शव सापडले आणि दुःखत गोष्ट ही की ते शव पंडित दिनद्याल उपाध्याय यांचे होते. पंडित दिनद्याल उपाध्याय यांनी आपले संपुर्ण जिवन देश कार्यासाठी, राष्ट्रनिर्माणासाठी समप्रित केले आज ईतके वर्ष होऊन ही पंडित दिनद्याल उपाध्याय यांचे मारेकरी सापडले नाहीत ती केस हि बंद करण्यात आली परंतु पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्या सारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला आज देश विसरत चाललाय हे खुप दुःखत आणि वेदना दाई आहे.
जाते वेळी एकच वाक्य पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्या साठी....

"प्रभावशाली व्यक्तिमत्त्वा, प्रखर चिंतक, एक सामान्य भारतीय, गर्दीमध्ये गायब होणारा सामान्य चेहरा, एक असा सामान्य मनुष्य ज्याच्यात लपलेला आकाशा समान व्यक्तिमत्त्व समुद्रा समान विचार आणि वेळेप्रमाणे पद्द चिन्ह सोडण्याची क्षमता असे होते एकात्म मानववाद आणि अंत्योद्यचे प्रणेता पंडित दिनद्याल उपाध्याय"

लोकनेता

लोकनेता  अटल बिहारी वाजपेयी        भारतीय राजकारणातला ध्रुव तारा, अपयाशांच्या अंधकारात यशाचा दिवा, कवितांच्या माध्यमातुन लोकप्र...