लोकनेता
अटल बिहारी वाजपेयी
भारतीय राजकारणातला ध्रुव तारा, अपयाशांच्या अंधकारात यशाचा दिवा, कवितांच्या माध्यमातुन लोकप्रियता मिळवनारा, सदा आपल्या विचारांवर नावा प्रमाणेच अटल राहणारे, आपल्या मागृदर्शकां प्रमाणेच मेहनती आणि चाणक्य बुध्दीचे असे व्यक्तीमत्त्व, भारतीय राजकारणातील निवडक आदर्श व्यक्तीमत्त्वांमधील एक व्यक्तीमत्त्व म्हणजे लोकनेता माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी.....
अटल बिहारी वाजपेयी हे व्यक्तीमत्त्व आत्ताच्या कोणत्याही पिढीला सांगण्याची गरज बहुंताशी नाही. कारण ज्या वेळेस अपयशा पासुन यशा पर्यंतची उदाहरणे दिली जातात तेव्हा अटलजींनच नाव सर्वात आधी येत. अर्थात अटलजींनचा महत्वाचा प्रवास आज ही लोकांपासुन लपलेला आहे. हे ही तितकेच सत्य अटलजींचा प्रवास जाणण्याआधी प्रारभींची माहिती घेऊयात.
अटल बिहारी वाजपेयींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ साली वर्तमान मध्यप्रदेश मधील ग्वालियर स्थीत शिंन्दे की छावनी मध्ये जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण बिहारी तर आईचे नाव कृष्णा देवी होते. वडिल पेशाने एक शिक्षक होते आणि त्याच बरोबर एक कवि ही होते. अटलजींना कविता लिहण्याची कला त्यांच्या वडीलांपासुनच अवगत झाली. अटलजींनच प्रारंभीच शिक्षण ग्वालियरच्या महाराज बारेच्या जवळ गोरखी मध्ये स्थित एका शाळेत झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण ग्वालियर मधील विक्टोरिया कॉलेज (वर्तमान महाराणी लक्ष्मीबाई कॉलेज) मधुन करून बी.ए. ची डिगरी मिळवली त्याच बरोबर ते या वेळेस छात्र संघाचे मंत्री व उपाध्यक्ष ही राहीले. पुढे कानपुर मधील डि.ए.व्ही (द्यानन्द एड्ग.लो वैदिक) कॉलेज मध्ये राजनिती शास्त्र मध्ये एम.ऎ. ची परीक्षा प्रथम श्रेणीने पास झाले. पुढे एल.एल.बी. च शिक्षण घेण्यासाठी तिथेच प्रवेश घेतला आणि त्याच बरोबर त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या वडीलांनीही पुन्हा शिक्षण घेण्याचा निश्चय केला आणि दोन्ही पिता-पुत्रांनी प्रवेश घेऊन आपल्या शिक्षणाला सुरुवात केली हेच क्षणडि.ए.व्ही. कॉलेजचे ऎतिहासिक क्षण म्हणुन नामांकित झाले की ऎकाच वर्गात पिता-पुत्र दोघेही बसत आणि आपले शिक्षण पुर्ण करत परंतु हे संबध जास्त दिवस टिकले नाहित कारण अटलजींनी आपले एल.एल.बी. चे शिक्षण अर्धवट सोडून स्वःइच्छेने संघ कार्याची पुर्ण वेळ प्रचारक म्हणुन जबाबदारी स्वीकारली.
१९४७ मध्ये लखनऊ मधुन राष्ट्रधर्मची सुरुवात झाली होती आणि त्याच बरोबर त्यांनी राष्ट्रधर्मचे संपादक म्हणुन जबाबदारी हाताळली. या वृत्तपत्रकाला राष्ट्रीय स्वरुप प्रदान केल याच बरोबर आपल्या कलेतुन याला लोकप्रियता मिळुन दिली तसेच महत्त्वाचे म्हणजे या वेळेस अटलजींना साथ लाभली ती पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्या लेखन कौशल्याची यामुळे या वृत्तपत्राला बळ मिळाले याच वेळेस अटलजींच्या संपादकीय चर्चा ही प्रसिध्द झालत्या या नंतर १९४८ ला पांञ्चजन्यची घोषणा केली. अटलजींच्या संपादकीय जबाबदारी खाली पहिल्याच अंकानी वाचकांची स्तुती मिळवली.
वैचारीक संपत्तीच्या आणि लेखन कौशल्याच्या जोरावर लखनऊ मधुनच दैनिक स्वदेशच संपादन चालु केल. या पत्रकार जिवनाची साखळी जुळली ती दिल्ली मध्ये वीर अर्जुन या वृत्तपत्राच्या संपादक म्हणुन यातील संपादकीय लेख राजकीय क्षेत्र आणि बुध्दजिवी यांच्या मध्ये खुप प्रसिध्द झाले. पत्रकार या विशेषणा सोबत आणखी एक विशेषणाने आपली ओळख निर्माण केलती ते म्हणजे कवी.
पत्रकार आणि कवी यासोबत आणखी एका विशेषणाने पुढे आपली ओळख निर्माण केली ते म्हणजे जननेता, लोकनेता, राजनेता अटल बिहारी वाजपेयी. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दिनद्याल उपाध्याय यांच्या मार्गदर्शना खाली राजनैतिक मार्ग तयार होत गेला.
१९५७ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तरप्रदेश मधील बलरामपुर येथुन विजयी होऊन लोकसभेत प्रवेश केला पुढे लगातार २० वर्षे जनसंघाचे संसदेत पक्षनेता राहीले. या काळामध्ये अटलजींना काळा दिवस ही बघावे लागले जेव्हा श्यामा प्रसाद मुखर्जींचा व पंडित दिनद्याल उपाध्याय यांचे संशयास्पद ह्त्या झाल्या. काळ जसा पुढे जात होता तसा पक्षाला उतार चढावाचा सामना करावा लागत होता. पुढे २५ जुन १९७५ साली आणिबाणी जाहीर झाली आणि प्रत्येक विरोधी पक्ष्यांच्या नेत्यांना जेलमध्ये डांबण्यात आले. याच काळात नवनवीन नेतृत्वांचाही प्रवास चालु झाला तसेच आणिबाणी नंतर लोकनायक जयप्रकाश यांच्या नेतृत्वात जनता पार्टीच गटबंधन करण्यात आले. ज्याच्यात भारतीय जनसंघाचा ही विलय झाला आणि नंतर जनता पार्टीच सरकार स्थापन झाल आणि त्यात अटल बिहारी वाजपेयी झाले विदेश मंत्री, अटलजींनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पहिल्यांदा हिंदी मध्ये भाषण देऊन इतिहास रचला.
६ अप्रेल १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली आणि अटलजींचा पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन निवड झाली या वेळेस मुंबईत झालेल्या अधिवेशनात लोकप्रिय भाषण देऊन सर्व कार्यकर्तांचे मने जिंकली. 👇
राजकारणातल्या गणीतांचा उतार चढाव झेलत अपयशाला पचवत यशाच्या पायय्रा चढण्याचा प्रयत्न चालुच होता. या दरम्यानच्या काळात जेव्हा संसदेत इंदिरा गांधी आणि अटलजींची समोरा-समोर बाचाबाची झालती तेव्हा सत्ताधारी जागेवर इंदिराजी होत्या आणि विरोधी बाकावर अटलजी आणि त्यांचे खासदार होते तेव्हा इंदिराजींनी रागाच्या भारात अटलजींना धमकी वजा इशारा दिला की अवघ्या ५ मिनीटांत मी तुमच्या प्रत्येक खासदाराला आणि तुमच्या नेत्यांना माझ्याकडे आणुन तुमच्या पक्षाला संपवु शकते. तेव्हा अटलजींनी हसत हसत उत्तर दिलत की अवघ्या ५ मिनीटांत तुम्ही तुमच्या केंस विंचरु शकत नाहीत तर माझा पक्ष खुप मोठी गोष्ट झाली. अटलजींच्या अशाच चाणक्ष्य उत्तरांनी अनेक वेळा विरोधकांना घाम फुटायचा.
अटलजींनी व त्यांच्या मार्गदर्शकांनी अर्थात श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दिनद्याल उपाध्याय व इतरांनी कधीही देशाच्या सुरक्षेसाठी अडथळा होईल अशा गोष्टी केल्या नाहीत. अटलजी व त्यांचा पक्ष विरोधी बाकांवर बसला असला तरी देशाच्या सुरक्षेसाठी बिनविरोध पाठिंबा द्यायचे याचा अनुभव खलिस्तानच्या वेळेस ही आलता जेव्हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांन कडुन खलिस्तानची मागणी जोर धरत होती. काही अतिरेकी शिखांचे पवित्र धार्मिक स्थळ अमृतसर मधील सुवर्ण मंदीरात लपले होते तेव्हा १ जुन १९८४ रोजी इंदिराजींनी "ऑपरेशन ब्लू स्टार" राबवण्यास सांगितल. याला काही शिखांचा विरोध होता कारण सैन्यदल आपल्या रणगाड्यांसोबत सुवर्ण मंदिरात प्रवेश करणार होते. परंतु फक्त देश सुरक्षेच्या कारणास्थव ऑपरेशन ब्लू स्टारचे विरोधी पक्षांनी समर्थन केले.
३१ ऑक्टोबर १९८४ साली इंदिरा गांधीच्या झालेल्या हत्येनंतर ज्या काही शिख हत्याकांड घडवण्यात आले. त्या हत्याकांडाचे अटलजींनी व त्यांच्या पक्षानी प्रखर विरोध केला. यानंतर इंदिरा गांधीचे मोठे चिरंजीव अर्थात राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा अटलजी स्वतः निवडणूकीत हारले होते. अटलजींच्या पक्षाचे फक्त २ सांसद जिंकले होते तेव्हा राजीव गांधीनी अटलजींची खिल्ली उडवत बोलले होते की कुटूंब नियोजनाचे उत्तम उदाहरण स्वतः अटलजींचा पक्ष आहे अवघे २ सांसद पाटवलेत तेव्हा अटलजींनी कसे स्वताःला सावरले असेल याचे आपण फक्त कल्पना करु शकतो कारण अटलजींना अपयश वेळोवेळी पहावे लागत होते परंतु अश्या वेळेस महत्त्वाची साथ लाभली ती अटलजींचे परम मित्र लालकृष्ण अडवाणी यांची. दोघांनी एकमेकांना साथ देत आपले प्रयत्न चालु टेवले. या सर्व अपयशानंतर यशाची पहिली किरण पडली ती १९९६ ला ११ व्या लोकसभेत अटलजी पंतप्रधान म्हणुन विराजमान होतात पण हा कालावधी फक्त १३ दिवसांचाच होता. १९९८ मध्ये पुन्हा अटलजी पंतप्रधान झाले आणि १३ महिने चाललेल्या या सरकारचे नेतृत्व त्यांनी केल पण ह्या वेळेस तयार केलेल्या एन.डी.ऎ.( ) (रा.लो.आ.) चा पाठिंबा आण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी काडून घेतला आणि विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या १ मताने पडले विरोधी पक्ष सुध्दा सरकार स्थापन करु शकला नाही व अखेर भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरे गेला परंतु या काळात अटलजींनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांनी लोकांचे मने जिंकुन घेतली. यातील महत्त्वाचे २ निर्णय खालील प्रमाणे (सविस्तर)
१९९८ मध्ये राजस्थान स्थित पोखरण मध्ये ५ भुमीगत परमाणु परिक्षण करुन भारताला परमाणु संपन्न देश तयार केला याच कारणाने भारत अंतरराष्ट्रीय स्तरावर महाशक्ती म्हणुन स्थापित झाला या परिक्षणामुळे जगाला हादरातर बसलाच पण प्रामुख्याने हा हादरा अमेरिकेला जोरात बसला कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी करणाय्रा उपग्रहाला चुकवून हे परिक्षण पार पाडले होते.( याबद्द्ल मनोरजनात्मक तो त्र्तिल तुम्हाला अनुभवायचा असेल तर ज्वान अब्राहीम यांचा परमाणु हा सिनेमा नक्की पहा ). रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापुर्ण उपयोगासाठी हे परिक्षण आहे असे म्हणुन समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले, तरी अटलजींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्याची झळ लागली नाही उलट अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधनाने वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळी व्यापार व विदेशी गुंतवणुकीच्या रुपात शंभर हजार करोड पर्यंत वाढ होऊन आधीच्या सरकारांच्या काळात "कर्जबाजारी" हे देशाला लागलेले विशेषण गळुन पडले व भारत इतर देशांना कर्ज देऊ लागला.
"हम हमारे दोस्त बदल सकते है, हमारे पडोसी नही" असे म्हणणारे अटलजी आपल्या शेजारील देशांसोबत चांगले संबंध रहावे म्हणुन एक पाऊल पुढे टाकत त्यांनी दिल्ली-लाहोर बस सेवा चालु केली. स्वतः अटलजी पहिल्या बसने पाकिस्तानला शांततेचा प्रस्ताव घेऊन गेले. त्या वेळी पाकिस्तान मध्ये संयुक्त भेटी गाटी चालु होत्या तेव्हा एका महीला पत्रकारांनी अटलजींना प्रश्न विचारला होता की तुम्ही आता पर्यंत लग्न का नाही केले? मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे परंतु मला मुदिखाई(लग्नाच्या आधी नवरा मुलींची ज्या वेळेस भेट घेतात तेव्हांची रसम) च्या वेळेस भेट म्हणुन कश्मिर हवा आहे, या प्रश्नाला अटलजींनी स्मित हास्य करत मिस्कील अंदाजात उत्तर दिले. "मी तयार आहे" परंतु माझी ही एक अट आहे मला दहेज (हुंडा) म्हणुन पुर्ण पाकिस्तान हवा आहे आपण तयार आहात... हे उत्तर ऎकल्यावर तेथील प्रत्येक मनुष्याच्या चेहय्रावर हसु फुलले. परंतु ह्या सर्व घडामोडी घडताना पाकिस्तानचे सैन्य त्यांच्या पापी कृत्याची तयारी करत होता ह्या वेळी पुन्हा पाकिस्तानी सैन्यानी पाठीत खंजीर खुपसला होता. कारगिल परिसरात घुसपैठ करुन डोंगराळ प्रदेश त्यांनी त्यांच्या कब्जात घेतला. अंतरराष्ट्रीय सिमाउल्लंघनाचा आदर करत प्रत्युतर म्हणुन "ऑपरेशन विजय" राबवण्यात आले आणि सैन्याच्या मनोबलाच्या जोरावर भारतीय सैन्याने आपला भाग पुन्हा मिळवला. ह्या गोष्टींन मुळे अटलजी भारतीय जनतेच्या मनावर राज्य करत होते तसेच विश्वास मत प्रस्तावावेळी अटलजींनी दिलेल भाषण दुरदर्शनवरुन पुर्ण भारत पहात होता त्यामुळे पुढच्या वेळी स्वताःच्या बळावर सत्ता स्थापनेचा दावा खरा ठरला आणि १९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एन.डी.ऎ) ला घवघवीत यश मिळाले आणि अटलजींनी सलग तिसय्रांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
पुढील काळात अटलजींनी खुप काम केले यात त्यांना संकटाना ही तोंड द्यावे लागले त्यातील महत्त्वाचे म्हणजे १९९९ साली तालीबान अतिरेक्यांनी आय.सी.-८१४ या प्रवासी विमानाचे केलेले अपहरण हे विमान नेपाळची राजधानी काठमांडू कडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने ३ अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका केली. यानंतरच २ संकट होत ते २००१ साली संसदेवर झालेला हल्ला यावेळेस दहशतवादी अफजल गुरु आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक शहीद झाले मात्र दहशतवाद्यांचा खात्मा पोलिसांनी केला म्हणुन मोठा अनर्थ टळला, कारण एका दहशतवाद्याच्या अंगावर पुर्ण संसद भवन उडवू शकेल एवढे आर.डी.एक्स. होते, अटलजींच्या काळात जेवढे संकट आले त्या संकटाना अटलजीनी योग्य उत्तर दिले.
अटलजींनी त्यांच्या याच काळात महत्त्वपुर्ण काम केले ज्या कांमामुळे भारताचा चेहराच बदलुन गेलता. सॉफ्टवेअरच्या विकासासाठी माहिती तंत्रज्ञान कार्यबलाची निर्मिती केली, केंन्द्रीय ऊर्जा नियंत्रण आयोगा सारख्या महत्त्वपुर्ण संस्थान्नाची निर्मिती केली, सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केली, राष्ट्रीय राज्य मार्गांचा विस्तार करुन देश जोडणीसाठी स्वर्णिम चतुर्भुज योजनेची सुरुवात केली, टेलिकॉम ची फाईल उघडुन सामान्य जनतेसाठी उपयोगात आणली, विमानतळासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले, कोकण रेल्वेसाठी ही त्यांचे महत्त्वाचे काम केले, तसेच प्रधानमंत्री ग्रामविकास सडक योजनेची सुरुवात ही अटलजींच्याच कार्यकाळात चालु झालत्या. सध्या मोदी सरकार किंवा या आधीच्या यु.पि.ऎ. सरकार मध्ये घेतलेले निर्णयांची सुरुवात अटलजींच्याच कार्यकाळात झालती.
अटलजींच भारतीय राजकारणातल योगदान खुप मोठ आहे. अटलजी भारतीय राजकारणातले असे एकमेव व्यक्तीमत्त्व आहे की ज्यांच्या बद्द्ल त्यांचे विपक्षी ही सदा स्तुती सुमनच ऊधळतात, अटलजी सामान्य जनते बरोबरच स्वपक्षातील आणि विरोधी पक्षातील नेत्यांचेही मने जिंकून बसले होते. देशाच्या भल्यासाठी कोणताही महत्त्वाचा निर्णय असो किंवा कोणती ही महत्त्वाची अडचण असली की विपक्षी लोक अटलजींकडे मदत मागत असे.
अटलजींच्या कविता सर्वांना प्रेरणा तर देतातच पण त्यांच्या कवितांची ओळंन ओळ आज ही सगळ्यांच्या मनावर राज्य करते अटलजी भले २००४ मध्ये निवडणूकीत त्यांची जादू दाखवु शकले नाहीत पण त्यांनी हार मानली नाही. ब्रिजेश मिर्शा जे अटलजींचे जवळचे सल्लागार होते त्यांनी अटलजींना विचारल "ये क्या हुआ" तेव्हा अटलजींनी स्मित हास्य करत उत्तर दिले "ये तो विपक्ष को भी नही पता"
अटलजींचा हाच मिस्कील स्वभाव प्रत्येकाला भावला होता. अटलजींना २०१४ मध्ये भारतरत्न देऊन सन्मानीत करण्यात आले. पुढे १६ ऑगस्ट २०१८ मध्ये अटलजींच निधन झाले. अटलजींच नाव घेतल की सर्वात आधी आठवतात ते अटलजींच्या कविता आणि त्यांच वक्तृत्व अटलजींच संसदेत जेव्हा जेव्हा भाषण झाले तेव्हा तेव्हा सर्व विपक्षी लोक तेथे उपस्थीत असायचे प्रत्येक सांसद अटलजींना ऎकण्यासाठी आतुर असायचा अटलजींनी सांगितलेल्या प्रत्येक चुकांची माहिती घेऊन त्यात बद्दल करायचे. एकमेव नेता जो आपल्या प्रत्येक शब्दांवर आपल्या नावाप्रमाणे अटल राहीला असे लोकनेता माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी....
अटलजींचे कार्यकर्ते निवडणूकांवेळी एक घोषणा द्यायचे ती घोषणा पुर्णताः सत्य ठरली ती म्हणजे.....
"सबसे भारी
अटल बिहारी"
जाता जाता अटलजींची ती कविता ज्या कवितेने अटलजींना पुन्हा पुन्हा उभ राहण्यासाठी प्रोत्साहीत केल ती कविता आज ही आम्हाला प्रोत्साहीत करते....
टूटे हुए सपनों की कोन सुनें सिसकी,
अन्तर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी,
हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानुंगा,
काल के कपाल पे लिखता मिटाता हुँ,
गीत नया गाता हुँ,
गीत नया गाता हुँ,